ओव्हरटेकच्या नादात ट्रकची कारला जोरदार धडक

truckcha apghat

जळगाव प्रतिनिधी । जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. मात्र कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्याने कार चालक जीव वाचला आहे. ही घटना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गोदावारी वैद्यकिय महाविद्यालयाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याचवेळी समोरून सावदा येथील बांधकाम अभियंता हे आपल्या कार क्रमांक (एमएच 19 बीयु 4040) ने सावदा येथून भुसावळमार्गे जळगाव येथे येत असतांना ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र स्विप्ट कारच्या एअरबॅग अपघात होताच तत्काळ उघडल्याने अभियंताचा जिव वाचला.

याच रस्त्याने आमदार हरीभाऊ जावळे हे जात असतांना त्यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. अपघात होऊन किमान अर्धातास झाला मात्र नशिराबाद पोलीस घटनास्थळी नसल्याने नागरींकांचा संताप व्यक्त होत होता. दरम्यान अपघात होताच ट्रक चालकासह क्लिनर दोघे फरार झाले होते.

Protected Content