जळगावात धावत्या रेल्वेखाली अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

sucide

जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केलेल्या एका प्रौढाचा मृतदेह चाकासमोरील जाळीत अडकुन सुमारे किलोमिटर पर्यंत फरफटत आला. लोको पायलटच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने रेल्वे थांबवून लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

या प्रौढाची ओळख पटलेली नाही. रविवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.
भुसावळ येथुन जळगावात येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्सप्रेसच्या समोर लेंडी नाला पुलाजवळ एका पौढाने उडी घेतली. जागेवरच त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह चाकाच्या जवळ असलेल्या जाळीत अडकला. हा मृतदेह सुमारे एक किलोमिटर पर्यंत फरफटत राहिला. यानंतर रेल्वे स्थानकापासून अवघ्या १०० मिटर अंतरावर लोको पायलटच्या लक्षात ही बाब आली. त्याने रेल्वे थांबवून लोहमार्ग पोलिसांना संपर्क साधला. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अनिंद्र नगराळे, योगेश अडकने या दोघांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. यानंतर ओळख पटवण्यासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या पौढाच्या अंगात सफेद बनियन व पॅन्ट आहे. सुमारे ४५ वर्षे वय असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्याचा मृतदेह फरफटत असल्याचे पाहिल्याने नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Protected Content