ही तर सर्वसामान्यांची क्रूर थट्टा ! : फडणविसांची टीका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने इंधन दरात अल्प मूल्य कमी केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारचा निर्णय म्हणजे उंटाच्या तोंडाच जिर्‍यांसमान होय. अन्य राज्य सरकारांकडून इंधन दरात ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्यानं दीड आणि २ रुपये दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: