मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील प्रचंड राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज सायंकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.
आज दिवसभर प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. यात विधानसभा बरखास्त करणार की, मुख्यमंत्री राजीनामा देणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांची संख्या असल्याने त्यांना गटाची मान्यता मिळण्यात काहीही अडचण येणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमिवर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाईव्ह आणि इतर सोशल मीडियाच्या माधम्यातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. यात ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी शिवसेना विधीमंडळाच्या मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटमधून दिली आहे. आजच्या आमदारांच्या बैठकीबाबत सुनील प्रभू यांनी काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.