कौटुंबिक कारणावरुन इस्लामपुर्‍यात हाणामारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। कौटुंबिक कारणावरुन इस्लामपुर्‍यात हाणामारी झाल्याची घटना घडली. यात मारहाण करणार्‍यांनी चाकूसह लोखंडी रॉडने वार करुन एकमेकांना जखमी केले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या फिर्यादीनुसार, शहराती इस्लामपुरा परिसरातील दानिश शेख इकबाल कुरेशी (वय-१९) हे वास्तव्यास आहे. त्यांच्या बहिणीला माहेरची लोक त्रास देत असल्याने दानिश हा त्यांना समजविण्यासाठी मंगळवारी २१ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गेला होता. यावेळी त्यांच्याकडून दानिशला पकडून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच मुस्तकीम शेख अजीज कुरेशी याने चाकूने दानिशवर वार करुन त्याला जखमी केले. याप्रकरणी दानिशच्या तक्रारीवरुन अशफाक शेख अजीज कुरेशी, मुस्तकिम शेख अजीज कुरेशी, राजीक शेख अजीज कुरेशी, आबेदाबी शेख अजीज कुरेशी सर्व रा. भवानीपेठ इस्लामपुरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील इस्लामपुर्‍यातील मुस्तकीम शेख अजीज कुरेशी (वय-२६) यांना घरगुती भांडणाच्या कारणावरुन दानिश शेख व ताबीश शेख इकबाल यांनी बेदम मारहाण केली. ताबीश याने दुचाकीच्या शॉकअप रॉड मुस्तकीमच्या डोक्यावर मारुन त्याला जखमी केले. याप्रकरणी दानिश शेख इकबाल कुरेशी व ताबीश शेख इकबाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!