एरंडोल प्रतिनिधी । येथील जय श्रीराम प्रतिष्ठानातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील भागवत कथा व एक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरात श्रीराम प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षापासून गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीपर्यंत सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात यावर्षी रोज संध्याकाळी भागवत कथा व एक दिवस नेत्र आणि थायोराईड तपासणीचे विनामूल्य शिबिर ठेवण्यात आले होते.
महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून प्रतिष्ठानातर्फे यावर्षी जळगाव येथील सागर नेत्रालय यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन विनामूल्य करण्यात आले. ज्या पेशंटांना शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल, अशा रुग्णांसाठी जळगाव येथील त्यांच्या हॉस्पिटल मध्ये मोठ्या सवलतीमध्ये ऑपरेशन करण्यात येईल, असे आश्वासन डॉ.आम्रपाली कांकरिया यांनी दिले. तसेच मुंबई येथील अमोल देशमुख या थायरॉईड स्पेशलिस्ट डॉक्टरांनी एरंडोलसह तालुक्यातील रुग्णांची थायरॉईड तपासणी विनामूल्य केली.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील, अमर महाजन, प्रदीप खराडे, कृष्णा पाटील, अमित पाटील, सदानंद पाटील, ज्ञानेश्वर गुजर आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान कार्यक्रमाची सांगता व महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. असून भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.