कुणाचाही ‘बाप’ काढलेला नाही- चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

पुणे । आपण कुणाचाही ‘बाप’ काढलेला नसून यातून कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाप हा शब्द वापरण्यावरून झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, “मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. त्यापैकी बाप हा सुद्धा एक शब्द आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत असं मी म्हणालो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Protected Content