खासगी क्षेत्रातल्या कामगारांसाठी केंद्राची लवकरच कॅश व्हाऊचर योजना

नवी दिल्ली- बाजारातील ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढवण्यासाठी मोदी सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एलटीएमध्ये कॅश व्हाऊचर देण्याची योजना आखली. आता अशाच प्रकारची योजना खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात येणार आहे.

सरकारी कर्मचारी एलटीसीमध्ये मिळणाऱ्या कॅश व्हाऊचरच्या मदतीनं किमान १२ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू (खाद्यपदार्थांच्या व्यतिरिक्त) खरेदी करू शकतात. आता अशीच योजना खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी आणली जाणार आहे. त्यामुळे एलटीएमधून मिळणाऱ्या पैशातून कर्मचाऱ्यांनी वस्तू खरेदी केल्यास त्यांना करात सवलत मिळेल. यामुळे २८ हजार कोटींची अतिरिक्त मागणी निर्माण होईल, असा सरकारचा अंदाज आहे.

Protected Content