मोठी बातमी : राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन १९९१ मध्ये स्थापन झालेल्या राजीव गांधी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने करवाई करून एफसीआरए लायसन्स रद्द केली आहे. परदेशातून येणाऱ्या निधीबाबत नियमांचे उल्लंघन केल्याने फाऊंडेशनवर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या ‘राजीव गांधी फाउंडेशन’ ही संस्थान २१ जून १९९१ रोजी स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेला चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२० मध्ये केंद्रीय गृह खात्याने स्थापन केलेल्या एका समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजीव गांधी फाउंडेशन परदेशातून निधी स्वीकारू शकत नाही.

 

केंद्रातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘राजीव गांधी फाउंडेशन’चे एफसीआरए लायसन्स केंद्र सरकारकडून रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने केलेल्या या कारवाईवर  संस्थेकडून अथवा काँग्रेस नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. ‘राजीव गांधी फाउंडेशन’ च्या अध्यक्षपदी सोनिया गांधी आहेत. तर, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे संस्थेचे विश्वस्त आहेत.

 

Protected Content