दारूच्या नशेत एकाला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत एकाला शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमा गणपत अंभोरे (वय-५९) रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शनिवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजच्या सुमारास सोमा अंभारे हे घरी असतांना शाबीर (पुर्ण नाव माहीत नाही) यासह इतर तीन अनोळखी तीन जणांनी दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसंतांना शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी सोमा अंभोरे गेले असता चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व जीवेठार मरण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमा अंभोरे यांनी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शाबीर यासह इतर अनोळखी तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरूण सोनार करीत आहे.

Protected Content