नोकरी लावण्यासाठी विवाहितेला पाच लाखांची मागणी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरी लागण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात पतीसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा किशोर सैंदाणे (वय-२४) यांचा विवाह मुंबई येथील किशोर आसाराम सैंदाणे यांच्याशी रितीरिवाजानुसार २०१७ मध्ये झाला. लग्नाच्या सुरुवातीचे चांगले दिवस गेल्यानंतर पती किशोर सैंदाणे याने पतीला नोकरी लागण्यासाठी बाहेरून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. पैसे देण्यास विवाहितेने नकार दिल्याने तिला मानसिक व शारीरिक छळ व उपाशी पोटी ठेवून मारहाण केली. तसेच विवाहितेची, मुलगी व माहेरच्या लोकांना जीवेठार मारण्याची धमकी देखील देण्यात आले. तसेच तिच्या अंगावरील श्रीधन देखील काढून घेतले. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. शनिवार २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता विवाहितेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती आसाराम सैंदाणे, सासू केवळबाई आसाराम सैंदाणे, सासरे आसाराम जुलाल सैंदाणे तीघे रा. कुर्ला मुंबई, सुनील जुलाल सैंदाणे रा बोदर्डे ता. पारोळा आणि रमेश रामलाल पवार रा. मोरफड ता.पारोळा यांच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहे.

Protected Content