पहुरमध्ये आढळली नकोशी मृतावस्थेत

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर शिवनगरातील कचऱ्याच्या उकिरड्यावर स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवनगर भागात उकीरड्यावरील कचऱ्यात आज शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. यामुळे  एकच खळबळ उडाली.  शिवनगर येथील रहिवासी मुन्नीबाई सांडू तडवी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चौधरी हे करीत आहेत. दरम्यान सदर अर्भक हे अनैतिक संबंधामुळे उकिरड्यावर फेकण्यात आल्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!