खामगाव सृष्टी मंगलम् प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण मास

खामगाव प्रतिनिधी । भारतात श्रावण मास, अधिक मास, कार्तिक मास असे अनेक मास मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. अशीच एक संकल्पना पर्यावरण मास म्हणून येथील सृष्टी मंगलम् प्रतिष्ठान, खामगावतर्फे दि.५जून जागतिक पर्यावरण दिनापासून शहरातील टक्कल पडलेल्या टेकड्यांवर वृक्षारोपण तथा बिजरोपण माध्यमातून राबविण्यात येत आहे.

दरम्यान, घाटपूरी शिवारातील सोनबर्डी,लेकुरवाडी व नंदाखोरी तसेच सोबतच सजनपूरी येथील हंड्याबरड, तपोवन, ॠषीसंकुल आणि जनूना शिवारातील टेकडीवरील परिसरात बीज संकलन, बीजारोपन, वृक्षारोपण या सोबतच भारतीय कमळ रोपन व वनराई बंधारा निर्माण करून मोठ्या उत्साहात पर्यावरण मास राबविण्यात आला आहे. 

या दरम्यान सृष्टी मंगलम् प्रतिष्ठानचे संस्थापक संजय गुरव यांनी शहरातील इतरही सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना या उपक्रमात मनापासून सामिल करून घेतले.कारण ह्या क्रार्या करीता अनंत हातांची गरज असते हे काम कुण्या एकट्याचे नाही.करिता अनेक सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना या उपक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.  प्रसंगी स्थानिक वृक्षांची बीजाची ओळख करून देवून जवळपास सहा पोती भरून बीज संकलन करण्यात आले व त्यांचे रोपवन करण्यात आले.

यामध्ये निम, करंजी, आवळा, मेहंदी, मोहात, टेंभूर्णी, बिचारा, शिंदे, चिंच, चेरी (सिंगापूर), जांभुळ, सविता अशोक, आंबा(गावरान), सिताफळ, अमलतास (बहावा), जंगली बदाम, अर्जुन या बीजाची रोपन करण्यात आले सोबतच “माळ तिथे ताळ” या उपक्रमांतर्गत एक हजार ताळ फळाचे बीजाची रोपन शहरातील लगतच्या माळावर (टेकडीवर) केले. वड,पिंपळाची वृक्षारोपण सोबतच बुच (बकान) वृक्षाची तीन फुट ऊंचीचे ३०० रोपाची लागवड करण्यात आली असून दि.१ जुई ते ५ जुलै या दरम्यान लेकुरवाडी टेकडीवर व नंदाखोरी परिसरात पाच वनराई बंधारे निर्माण करण्यात आले आहे. याच दरम्यान अकोला मुंबई बायपास  तसेच शेगाव नांदुरा बायपास दुभाजकावर जवळपास तीन हजार शिंदे बीजाची रोपन करण्यात आले.  कार्यकर्त्यांचा उत्साह बघून पुढील आठवड्यात आणखी काही टेकडीवर बीजारोपन व बंधारा या ठिकाणी तयार होणार आहेत.

याच दरम्यान याच ठिकाणी पर्यावरणरक्षण व संवर्धन या विषयाला अनुसरून कवी सम्मेलन सुध्दा घेण्यात आले. दि.२६जून रोजी श्रमदान करणा-या कार्यकर्ते मंडळीसाठी वनभोजन आयोजन करण्यात आले होते. या पर्यावरण मासा दरम्यान दृष्टीस पडणारे प्राणी,पक्षी,किटक यांची ओळख व अभ्यास करण्यात आला. या उपक्रमात वय वर्ष १५ ते ७० दरम्यानच्या निसर्गप्रेमींनी सहभागी होवून पर्यावरण मास यशस्वीपणे साजरा केला.यामध्ये सृष्टी मंगलम् प्रतिष्ठाण सोबतच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तरूणाई फाऊंडेशन, लाॅयन्स क्लब संस्कृती, राष्ट्रीय रहित सेना, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी आदींनी सहभाग नोंदविला.

 कलाध्यापक संजय गुरव यांची ही संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी  किशोर भागवत, वीरेंद्र शहा, चंद्रकांत केडीयाँ, राजेद्रसिंग राजपूत, राजपूत, मंगला गुरव, अमोल जोशी, मंगेश वानखेडे, सौ.वानखेडे, गौरव इंगळे ,गौरव वानखेडे, अनिल गवई ,मंजीतसिंग सिख राजेश कोल्हे गोपाल पवार, तेजस्वी भुंबरे ;श्रॄती वारकड, विकास आंबेकर, लाॅ. अभय अग्रवाल, लाॅ. अजय अग्रवाल, निताताई बोबडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Protected Content