अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे राजकारण नवनवीन विषयांमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी एक नव्या जोमाने तुतारी फुंकीत अनेकांची झोप उडवली होती. अर्थातच त्यांचे राजकारणात पुनरागमन होतंय म्हणून सर्वस्तरातून त्याच वेगाने स्वागत देखील करण्यात आले. परंतु आज दिवसभरातील घडामोडी मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्याच कारणही तसेच आहे.राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील थेट माजी आमदारांचा गावी राजवडच्या चरणी लीन झाले. आणि समाज माध्यम ढवळून निघाला. तो म्हणजे “पाडळसारे धरणासाठी दोन्ही दादा आले एकत्र”! खर तर हा प्रकल्प देखील संपूर्ण खान्देशाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु याचे “पाडळसे धरण,प्रचाराचे साधन ” असे होता नये.म्हणूनच की काय? सोशल मीडियावर जाणकार व चोखंदळ वाचकांकडून चांगल्या वाईट व तिखट प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.”तुम अमळनेर संभालो और हम मुंबई”.अशी देखील चर्चा सर्वत्र सुरू आहे. तर दुसरीकडे आज २९ जुलै रोजी झालेल्या घडामोडीनवर विश्वास ठेऊ नये असे संदेश मा.आ.साहेबराव पाटील यांचे कार्यकर्ते यांच्याकडून लागलीच व्हायरल केले जात आहेत. त्यातील मजकूर पुढील प्रमाणे.
आज रोजी आदर्शगाव राजवड येथे आमदार अनिल पाटील मंत्री महोदय व माजी नगरसेवक हे जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील याची तब्वेत खराब होती ते नाशिक येथे होत्या त्या रविवारी राजवड गावी आल्या. त्याच्या तब्यतेची (विचारपूस) बघण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा भेट करण्यासाठी गेले होते. याच्यात राजकीय चर्चा कोणतीच न होती त्यांच्यामुळे कोणीही राजकीय व चर्चा वळण आणू नये मा. आ. कषिभूषण साहेबराव दादा आपली भूमिका ९ ऑगस्ट क्रांती दिनी आपली भूमिका मांडतील कृपया कुणीही गैरसमज करू नये ही विनती. दरम्यान अमळनेर विधानसभा मतदारसंघात येत्या काळात अनेक राजकीय समिकरणे बदलतील यातील मात्र शंका नाही. एकेकाळी परिवर्तनाची चळवळ सुरू करून अमळनेरचा राजकारणात प्रवेश मिळवला होता. नुकतीच शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेतलेले साहेबराव दादा पाटील पुन्हा तुतारीने राजकीय हवाबदल करतात हे पाहणे औचिक्याचे ठरणार आहे.