अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निसर्डी शिवारातल्या शेतातील विहिरीत एका प्रौढाचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भीमराव वंजी पाटील (वय-५५, रा. निसर्डी ता.अमळनेर) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील निसर्डी गावात भीमराव पाटील हे वास्तव्याला होते. दरम्यान निसर्डी शेत शिवारातील शांताराम पाटील यांच्या शेतात असलेल्या विहिरीत त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब शनिवारी २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगतांना मिळून आला. दरम्यान या ठिकाणी अमळनेर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही आत्महत्या आहे की विहिरीत पडले याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.