तापी नदीच्या पुलाजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील तापी पुलाजवळ ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह. वेनरिबल अचिरानंद रेवती रंजन वय ६० रा. राहूल नगर, भुसावळ असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील राहूल नगरात वेनरिबल अचिरानंद रेवती रंजन हे वृध्द वास्तव्याला होते. भुसावळ शहरातील तापी नदीच्या पुलाजवळ त्यांचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे रवाना करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल चौधरी हे करीत आहे.

Protected Content