छ.संभाजीनगरात २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडले; परळी येथेही असाच प्रकार

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात १३ मे रोजी आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या ११ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगरात मतदानाला मोठा अडथळा आला आहे.
शहरातील २५ केंद्रावर ईव्हीएम मशीन बिघडल्याची बातमी समोर आली आहे. अखेर या ठिकाणी नव्या ईव्हीएम मशीन लावून मतदानाला सुरूवात झाली आहे. तर बीड जिल्हयातील परळी येथेही ईव्हीएम मशीन बिघडल्या आहे. त्यामुळे मतदानाला तब्बल पाऊणतास उशीर झाला आहे. त्यामुळे परळीमध्ये मतदानकेंद्राजवळ मोठी गर्दी झाली होती. राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने मतदार सकाळच्या वेळेत मतदान आटोपण्याला प्राधान्य देत आहेत.

Protected Content