करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मनसेने रद्द केला गुढीपाडवा मेळावा

मुंबई (वृत्तसंस्था) देशासह महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करत होते. पण करोना व्हायरसने राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोरनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने शासकीय, राजकीय तथा सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मनसेने देखील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपला गुढी पाडावा मेळावा रद्द केला आहे. दरम्यान, मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेसाठी बैठका, मेळावे सुरु होते. परंतू करोनाचा फैलाव रोखण्यासाठी यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करत आहोत असे मनसेने एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Protected Content