एकीकडे जागतिक विज्ञान दिन साजरा होत असतांना दुसरीकडे पर्यावरणाची होणार्या हानीचा मुद्दा चिंताजनक बनला आहे. या पार्श्वभूमिवर, वन अधिकारी आर.जी. राणे यांचा हा खास लेख.
विज्ञान व पर्यावरनामुळे जग वेगाने भरारी घेत आहे. एकीकडे मानव विज्ञानचा सहारा घेऊन नव-नवीन शोध लावत असतांना पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही जास्तीत-जास्त प्रमाणात जनते कडून वृक्ष लागवड करण्याची मोहीम राबवावे. यामुळे भुगर्भात पाण्याचे स्त्रोत झपाट्याने वाढनार आहे. यामुळे जागतीक तापमान वाढीपासुन देखील मुक्ती मिळेल. तत्त्व, सिद्धांत व जैविक-अजैविक घटकांमधील आंतरक्रियांचा तसेच विज्ञान आणि पर्यावरणचा अभ्यास आपण करत आहोत. पर्यावरण व शिक्षणात परिसंस्था- रचना, कार्य, संरक्षण व वृक्षसंवर्धन, जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरणाची आपत्ती-मानवी व नैसर्गिक,जैवलोकसंख्या,पर्यावरणाचा निरंतर शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका व कार्याचा ऊहापोह आपण या अभ्यासात करत आहोत. यामध्ये मृदावरण,जीवावरण,जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व, संबोधक आणि सिद्धांतासोबतच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण, तत्त्वज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या मॅन अँड नेचर या पुस्तकात (१९०७) मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा सुरु आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण व विज्ञानाचे शिक्षण देणारे पहिले पुस्तक आहे . १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी द आऊटलूक टॉक या नावाची संस्था स्थापन करून या संस्थेचे कार्य पर्यावरण शिक्षण सुधारणा असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव व जागृती करून पर्यावरणाचा र्हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण व विज्ञान् हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली आहे.
यात पर्यावरणाविषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण केली. तसेच पर्यावरण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये आहे त्यामुळे विज्ञाना सोबत मानवांनी वृक्ष लागवड सोबत पर्यावरणाच्या संवर्धनावर अधिक भर देण्याची गरज आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकतादेखील आहे.
आर.जी. राणे ( रावेर )