ठेकदाराचे सफाई कामगारांवर होणारे अन्याय थांबवा; धनंजय चौधरींचे तहसीलदारांना निवेदन

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | असंघटित सफाई कामगार यांच्यावर सेवा रोजगार सहकारी संस्था धुळे यांच्याकडून सतत अन्याय होत असून ते थांबले पाहिजे त्या संदर्भात नायब तहसीलदार संजय तायडे यांना काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी यांनी निवेदन दिले.

या संस्थेने दि.२१-१२-२०२२ पासून रावेर नगरपरिषदेचा ठेका घेतला आहे. ठेका घेतल्यापासून असंघटित सफाई कामगार यांना शासनाच्या नियमानुसार मजुरी देण्यात येत नसून त्यांना आतापर्यंत सुरक्षा किट, पावसाळ्यात रेनकोट आदी कोणत्याही सुविधा त्यांना देण्यात येत नाही. प्रत्येक कर्मचारी यांचा पी.एफ. ठेकेदाराने भरावा असा नियम असताना एकही सफाई कामगाराचा पी. एफ. ठेकेदाराने भरलेला नाही.

सुरक्षा कवच कामगारांना लागू नाही. हा ठेकेदार शासनाने सफाई कामगारांसाठी विविध योजना व सुख सुविधा पुरवाव्या असा नियम ठेकेदाराला असताना शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन करीत नाही अशा बेजबाबदार ठेकेदारावर कठोर कार्यवाही करावी. या असंघटित सफाई कामगारांवर होणारा अन्याय थांबवून योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी विनंती तहसीलदारांना धनंजय चौधरी यांनी केली आहे.

Protected Content