यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या अतुल पाटील मित्र परिवाराच्या वतीने शिक्षकांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात यावल येथील शिक्षक सुधीर चौधरी यांचा देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावल येथील प.पु.साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयाच्या प्रागंणात आयोजित अतुल पाटील मित्र परिवाराच्या आजी माजी शिक्षकांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ झाकीर हुसैन ऊर्दु हायस्कुलचे माजी प्रार्चाय आर. क्यु. शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, वसंत पाटील, अय्युब खान, पी. एस. सोनवणे, गोपाळसिंग पाटील, माजी प्राचार्य सांरगधर अडकमोल, प .पु .साने गुरुजी विधालयाचे प्रार्चाय एम. के. पाटील, माजी उपनगराध्यक्ष असलम खान यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक गुरूवर्य व शिक्षक सन्मान सोहळा या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात यावल येथील रहीवाशी व चुंचाळे येथील शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणारे सुधीर चौधरी यांचे शैक्षणिक योगदानाबद्दल अतुल पाटील मित्रपरिवार या मंडळीच्या वतीने स्मृतीचिन्ह व शाल देवुन अतुल पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय नन्नवरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डी के फेगडे यांनी मानले. शिक्षक व पत्रकार असलेले सुधीर चौधरी यांना सन्मान मिळाल्याबद्दल पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार अरूण पाटील, शेखर पटेल,पत्रकार डी बी पाटील,सुनिल गावडे , पत्रकार महेश पाटील, सुरेश पाटील ,जिवन चौधरी, पत्रकार तेजस यावलकर,फिरोज तडवी,नितिन झांबरे,विक्की वानखेडे, दिपक नेवे यांच्यासह आदी पत्रकारांनी त्यांचे स्वागत केले आहे.