यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजने साठी लागणारा उत्पन्न दाखला व रहीवाशी दाखल्याची अट तात्काळ शिथिल केल्यावर देखील यावलच्या तलाठी कार्यालयातील मंडळी दाखले देण्यासाठी टेबल लावुन बसल्याने नागरीकांनी दाखले मिळवण्यासाठी महिलांची मोठी गर्दी केली होती.
या संदर्भातील वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महिलांना आधार देणारी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी लागणारा उत्पन्नाचा व रहीवाशी दाखल्यामुळे मोठी डोकेदुखी वाढली होती. दरम्यान या दाखल्यांची अट शिथील करावी या करीता विविध पातळीवर मागणी करण्यात आली या मागणीचा राज्य शासनाने तात्काळ दखल घेत या योजनेसाठी लागणाऱ्या उत्पन्न दाखला आणि रहिवाशी दाखल्याच्या अटीशर्ती रद्द केल्या आहे. असे निर्णय शासनाच्या वतीने जाहीर झाले असतांना मात्र यावल येथे तलाठी कार्यालयाची मंडळी यावल तलाठी उत्पन्न व रहीवाशी दाखले देण्यासाठी शहराच्या जुन्या तहसील कार्यालयात दोन टेबल लावुन बसली होती.
राज्य शासनाचे आदेश धाब्यावर ठेवुन यावलच्या तलाठी कार्यालयाच्या मंडळीने या ठिकाणी दाखले देण्याच्या नावाखाली गरजु महिलांची मोठी गर्दी या ठिकाणी सकाळपासुन जमा करून महिलांना शासन आदेशाची माहिती न देता उत्पन्न दाखले व रहीवाशी दाखले देण्याचा सपाटाच लावला होता. या वेळी काँग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे यांनी व त्यांच्या सोबत विक्की गजरे, प्रदीप गजरे व गोकुळ मेढे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी या गरज नसतांना दाखले देण्यात येत असल्याच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना शासन आदेशाची माहिती दिली व तलाठी कार्यालयाच्या मंडळीने या योजनेसाठी उत्पन्न दाखले व रहीवाशी दाखल्यांची अट शासनाने तात्काळ शिथील केल्याची माहीती संदर्भातील फलक लावण्यात यावा अशा सुचना तलाठी यांना सांगीतल्यात असुन, यासाठी तालुक्यात विविध गावातील तलाठी कार्यालयांवर अटी शिथिल झाल्याचे माहीती फलक लावुन जनजागृती करावी अशी मागणी केली आहे.