सेवानिवृत्त पाणीपुरवठा कर्मचारी ईश्वर सुरवाडेंचा सरपंच लामखेडेंनी शाल श्रीफळ देऊन केला सन्मान

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ३० जून २०२४ रोजी वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी श्री ईश्वर चोखा सुरवाडे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वाकी बुद्रुक ग्रामपंचायत येथे संपन्न झाला.

सरपंच ललित लामखेडे यांनी त्यांचा शाल, ड्रेस व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. त्यांनी सलग 20 वर्षे कोणतीही तक्रार न येता अविरतपणे सेवा दिली वाकी बुद्रुक गावातील सर्व प्रमुख पाणी योजना त्यांच्या काळातच मार्गी लागल्या आहेत.याप्रसंगी ग्रामसेवक वसंत पवार, उपसरपंच कैलास सुरवाडे, सदस्य श्निलेश पाटील, एकनाथ पाटील, पवन राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content