जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनची आज (दि.28) स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी जमील देशपांडे यांची निवड करण्यात आली.
ड्रायव्हिंग स्कूलला येणाऱ्या विविध अडचणी आणि नवीन नियम याबाबत ड्रायव्हिंग स्कूल मालक एकत्र येत असोसिएशनची स्थापन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून कार्यकरणी निश्चित करण्यात आला आहे.
ती पुढीलप्रमाणे :-
अध्यक्ष जमील देशपांडे, उपाध्यक्ष रामभाऊ शिरसाट, सचिव किरण अडकमोल, सहसचिव नथु अहिरे, खजिनदार सुनील पाटील, सदस्य सागर मालपुरे, सुनील ठाकूर, रईस मिर्झा, विराज माथूरवैश्य असे आहेत. जिल्ह्यातील ड्राइविंग स्कूल मालक सदस्य होऊ शकतात.
त्याकरीत देशपांडे मोटर ड्राइविंग स्कूल येथे संपर्क साधावा असे आवाहन सचिव किरण अडकमोल यांनी केले आहे.