जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीच्या वतीने बळीराम पेठेतील पक्ष कार्यालयात आज गुरूवारी सकाळी ११.३० वाजता कोवीड वॉर रूमची स्थापना करण्यात आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी दिली आहे.
जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन बळीराम पेठेतील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात कोवीड हेल्प वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी 2 हेल्पलाइन नंबर नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून या नंबरवर गरजू व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी दिली.
आज गुरूवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आमदार राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याहस्ते हेल्प वार रूमची स्थापना करण्यात आले. याप्रसंगी सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, युवा मोर्चा महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, जिल्हा महानगर उपाध्यक्ष बापू ठाकरे, महानगर चिटणीस राजू मराठे, भगतसिंग निकम, नगरसेवक महेश चौधरी, रमेश जोगी, परेश जगताप, ओबीसी मोर्चाचे जयेश भावसार, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी, महानगर कार्यालय मंत्री प्रकाश पंडित यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.