रावेरात गौण खनिज वाहतुक परमीटमध्ये अटी-शर्तीचा भंग

रावेर प्रतिनिधी । रावेरात गौण खनिज वाहतुकीसाठी दिले जाणारे परमीट यामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या अटी-शर्तीचा भंग झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याचा फायदा गौण खनिज वाहतूक करणाऱ्‍यांना झाल्याच देखील कळते आहे.

महसूल प्रशासनाला रॉयल्टीच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात उपन्न मिळत असते. गौण खनिज वाहतुकीसाठी दिले जाणा-या परमीटमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या अटी-शर्तीचा भंग झाल्याची माहिती आहे. दरम्यान गौण खनिज परमिट वाटपात कोणत्याही प्रकारे अटी-शर्तीचा भंग झाले नसल्याचे गौण खनिज विभागाकडून सांगण्यात येत असले तरी माहिती अधिकारातुन गौण खनिज परमिट प्रकरणाची सत्यता जनते समोर येणार आहे. या संदर्भातची मागितलेली माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे गौण खनिज विभागा कडून सांगण्यात आले आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!