जळगाव प्रतिनिधी । देशाचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त नॅशनल एज्यकेशन डे साजरा केला जाता. या अनुषंगाने जळगाव शहरात उर्दू घर स्थापना करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातील अल्पसंख्यांक समाजाने केली आहे. याबाबत महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात उर्दू घर स्थापनेबाबत आदेश पारित केले आहे. राज्यातील नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, मुंबई या ठिकाणी उर्दू घर स्थापन झालेले आहे त्याच धर्तीवर जळगाव शहरात देखील उर्दू घराची स्थापना करावी. उर्दू घर स्थापन झाल्यास अल्पसंख्यांक समाजासाठी उर्दू व मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होऊन दोन्ही भाषांमधील लेखक आणि कवी, विद्वान आणि संशोधकांसाठी व्यासपीठ मिळेल. उर्दू घरामुळे सेंट्रल हॉल निर्माण होऊन त्या माध्यमाने ३०० ते ४०० नागरीक एका ठिकाणी बसून आपल्या आचार विचारांचे आदान-प्रदान होतील व त्यामुळे सलोख्याचे संबंध निर्माण होईल व अल्पसंख्यांक समाज हा विकासाकडे जाईल या उद्दिष्टपूर्तीसाठी उर्दू घराची स्थापना होणे आवश्यक असल्याचे या शिष्टमंडळाने आपल्या निवेदनात नमूद केलेले आहे.
याप्रसंगी मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, उर्दू विभाग प्रमुख डॉ. एम इकबाल, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मझहर पठाण, एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसेन, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष मोहिनुद्दीन शेख इक्बाल, शिवसेना उप महानगरप्रमुख रईस शेख, दानिश अहेमद, महानगराध्यक्ष नदीम काझी, सलीम इनामदार, मुस्लिम महिला सेवा संघाच्या अध्यक्ष फिरोजा शेख, नसरून फातेमा, शिकलगार बिरादरीचे संचालक अन्वर खान, काकर बिरादरीचे जिल्हाध्यक्ष रियाज वजीर, काट्या फाईल मित्रमंडळाचे फारूक अहेलेकार, जामा मसजीद ट्रस्टचे सय्यद चांद, हुसेनी सेना चे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, उर्दू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे हाफिज अब्दुल रहीम, उर्दू टाइम्स चे पत्रकार सईद पटेल आदींची उपस्थिती होती.