आ. गिरीश महाजनांच्या पुढाकाराने सार्वे-जामने गावात आरोग्य शिबीर

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील सार्वे-जामने गावात डेंग्यू व चिकन गुनियाचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आढळून आले असता ग्रामस्थांनी याची तक्रार माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्याकडे केली. याची तत्काळ दखल घेऊन आ. महाजन यांनी गावकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.

 

सार्वे-जामने गावात डेंग्यू व चिकन गुनियाचे रुग्ण आढळून येत असतांना आरोग्य प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप माजी सरपंच संजय पाटील यांनी केला. याबाबत माजी सरपंच संजय शांताराम पाटील यांनी पुढाकार घेऊन आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सर्व रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करून रुग्णांना औषधी मोफत देण्यात आले. या शिबिरात २५० रुग्णाची रक्त तपासणी तर ३०० रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनजी पाटील , ग्रामपंचायत सदस्य संजय आबा पाटील, डॉ. महेंद्र चव्हाण , डॉ. मयुरी पवार, डॉ. योगेश डाखणे, जी. एम.फौंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार , अनिल सोनवणे उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल व सार्वे-जामने ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.

Protected Content