लाचलुचपत विभागातर्फे उद्यापासून दक्षता जनजागृती सप्ताह

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लाचलुचपत विभागाच्या वतीने उद्यापासून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत माहिती अशी की, शासनाच्या वतीने दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने जळगाव लाचलुचपत विभागाच्या वतीने उद्या मंगळवारी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सप्ताहात लाचलुचपत विभागाची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अमंलबजावणी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यात नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, रेल्वे स्थानक परिसरात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत माहिती देणारे स्टिकर्स लावण्यात येणार आहे. सोबतच नागरीकांना हॅण्डबील वाटप होणार आहे. शहरातील मु.जे. महाविद्यालय, नुतन मराठा महाविद्याल आणि भुसावळातील नहाटा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भ्रष्टाचर निर्मुलानाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान शासकीय कामासाठी कुणी पैश्यांची मागणी केली जात असेल तर लाचलुचपत विभागाला त्वरीत माहिती देण्यात यावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content