एरंडोल (प्रतिनिधी) येथील स्थानिक कलावंत हर्षल संजय चौधरी आस्क मोशन फिल्म प्रस्तुत ‘ऑनलाईन मिस्टेक’या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहे. चित्रपटाचा मुख्य नायक विशाल पाटील यांच्या मित्राची भुमिका हर्षल चौधरी साकारणार आहे.
‘ऑन लाईन मिस्टेक’या चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर असुन डॉ. राजा माने व विनोद डवरे हे दिग्दर्शक आहेत. राज्यातील मागासलेल्या व विविध सोयी व सुविधांपासुन वंचित असलेल्या आदिवासी समाजाच्या जिवनावर आधारित या सिनेमाची कथा आहे. समाजाने दुर्लक्षित ठेवल्यामुळे आदिवासी समाजातील नागरिक नक्षलवादी कसे बनतात ? हे या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. तसेच आदिवासी आणि राज घराण्यातील तरुण-तरुणीची प्रेमकथाही यात दिसणार आहे. चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर हे स्वतः आदिवासी समाजाचे असल्यामुळे त्यांनी आदिवासींच्या जीवनाची वास्तविकता चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण यवतमाळ मधील पुसद, उमरखेड व कृष्णापूर या परिसरात करण्यात येत आहे. चित्रपटात चार गाणी असुन संगीत दिनेश अर्जुन यांनी दिले आहे.