पीर नथू बापू मिया यांच्या उरुसाचे कार्यक्रम रद्द

एरंडोल प्रतिनिधी– एरंडोल येथील नथू बापू मिया यांचा दिनांक २९ नोव्हेंबर पासून सुरु होणार्‍या उरूसाच्या निमित्ताने आयोजित होणारे सर्व कार्यक्रम कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय पंच कमिटीने घेतला आहे.

एरंडोल शहरातील पीर नथू बापू मीया यांचा उरुस हा एकात्मतेचे प्रतिक म्हणून मानला जातो. यंदा २९ नोव्हेंबर याला सुरूवात होणार होती. सालाबादप्रमाणे आठ ते दहा दिवस हा उरूस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उरुसात मोठ्या संख्येने हिदु मुस्लिम बांधव सहभागी होतात. मात्र यावर्षी कोरोना या विषाणूच्या महामारी मुळे पंच कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंच कमिटीचे अध्यक्ष नगराध्यक्ष रमेश परदेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक जहिरोद्दीन शेख कासम, सचिव जावेद मुजावर, नूरुद्दीन शेख महंमद, इकबाल मंसूरी, शेनफडू वाल्डे, परवेज मुजावर, सुभाष माधव पाटील, इस्माईल शेख हाशम व सुनील चौधरी हे उपस्थित होते.

या बैठकीत उरूस रद्द करण्याचा निर्णय एकमताने घषण्यात आला. कोरोना विषाणू मुळे यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून याची नोंद भाविक भक्तांनी व व्यापार्‍यांनी घ्यावी व पंच कमेटीला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले आहे.

Protected Content