एरंडोल येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

एरंडोल प्रतिनिधी । स्वामी विवेकानंद केंद्र आणि माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रा.ति. काबरे विद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

एरंडोल येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५८ व्या जयंती निमित्त दि.१७ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे रा. ती.काबरे विद्यालयात येथे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर स्वामी विवेकानंद केंद्र एरंडोल व माधवराव गोळवलकर रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.रक्तदान हेच जीवन दान असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेल्या ८ वर्षांपासून सदर शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

शिबिराचे उदघाटन एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, हवालदार अकील मुजावर, माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड,राष्ट्रवादीचे रविंद्र पाटील,माजी नगरसेवक डॉ.एन. डी.पाटील,सामाजिक कार्यकर्ते प्रसाद दंडवते,गणेश महाजन,नरेश डागा,डॉ.पिंगळे,योगेश्‍वर पतपेढी चे कर्मचारी मंगेश पाटील,जितेंद्र पाटील,संजय सुर्यवंशी,राजेंद्र पाटील,दिपक पाटील आदी उपस्थित होते.

या शिबिरात तब्बल १७५ नागरिकांनी रक्तदान केले. यात बंडू खोलापुरे यांनी वयाच्या ५९ वर्षी ७४ वेळा रक्तदान करुन विक्रम केला. बी.ए.एम.एस.करणारी हर्षदा वाघ,पशुवैद्यकीय अधिकारी एस.एम.महाजन,बालाजी ग्रुपचे प्रसाद काबरे,धनश्री इन्फ्रा.चे राहुल तिवारी,एम.डी.बी.केमिकल चे पंकज काबरा यांनी रक्तदान केले.

शिबिर यशस्वीतेसाठी माधवराव गोळवलकर रक्तपेढी चे डॉ.मकरंद वैद्य व त्यांचे सहकारी,विवेकानंद केंद्र शाखा एरंडोलचे प्रदीप जोशी, शैलेश पाटील, श्रेयस बडगुजर, आर.एम.कुलकर्णी, सागर महाजन, कुणाल पाटील, रितेश बोरसे, आश्‍विन माळी,कल्पेश महाजन,मयुर महाजन,रोहित महाजन,महेश महाजन,निलेश पांडे,सी.एस.महाले,बी.के.धुत, बी.पी.अढळकर,स्वप्निल महाजन यांनी परिश्रम घेतले.

Protected Content