दुर्बिणद्वारे गर्भपिशवी काढण्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे महिलेच्या पोटातून १ किलो वजनाचा गोळा काढून रुग्णास जीवदान देण्यात वैद्यकीय पथकाला यश मिळाले. सदर महिला रुग्णास अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत

 

मुंबई येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला मागील ६ महिन्यापासून पोटदुखी  व अतिरक्तस्राव होण्याच्या त्रास होत होता. त्यांना मुंबई येथे खाजगी रुग्णालयात गर्भापिशवी काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतू खर्च परवडत नसल्याने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे धाव घेतली. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग येथे त्यांना गर्भपिशवीला मोठी गाठ असल्याचे निदान झाले. त्यासाठी दुर्बिणद्वारे गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. दुर्बिणीदवारे १ किलो वजनाचा गोळा  शस्त्रक्रियेद्वारे काढून महिलेला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले.

 

तसेच साकुर, इगतपुरी येथे राहणाऱ्या महिला रुग्णाला मागील एक वर्षापासून अंगावरून अतिरक्तस्राव होण्याचा त्रास होत होता. त्याचे हिमोग्लोबिन केवळ ६ होते. त्यामुळे ३ पिशवी रक्त देण्यात आले. तपासणीअंती रुग्णाला गर्भपिशवी च्या १५ गाठी होत्या. या दोन्ही रुग्णाची गर्भापिशवी  दुर्बिणी्द्वारे डॉ. मिताली गोलेच्छा व सहकाऱ्यांनी काढली. दोन्ही रुग्णाना  अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे, सहयोगी प्रा. डॉ संजय बनसोडे यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

 

या गुंतगुंतिच्या शस्त्रक्रिया सहायक प्रा. डॉ मिताली गोलेच्छा, डॉ. प्रदीप लोखंडे ,डॉ संजीवनी अनेराय, डॉ. हेमंत पाटील, भूलतज्ज्ञ डॉ संदीप पटेल, निला जोशी यांनी पार पडली.

 

“शावैम” येथे गर्भापिशवी काढणे, कुटुंब नियोजन, वंध्यत्व निवारण अश्या अनेक प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया दुर्बिणी्दवारे केल्या जातात. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. स्त्री रोग विभागात नियमितपणे होणाऱ्या दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियाचा लाभ रुग्णांनी घ्यावा”

– डॉ.गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, जळगाव.

Protected Content