नाशिकमध्ये हाहाकार ऑक्सिजनच्या गळतीमुळे 11 रुग्णांचा मृत्यू

 नाशिक प्रतिनिधी | येथील महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये आज सकाळी ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

नाशिक महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या झाकीर हुसेन रुग्णालयांमध्ये आज सकाळी ऑक्‍सिजनचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीला अचानक गळती लागली. यामुळे काही क्षणातच खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या हॉस्पिटलमध्ये तब्बल 171 जण हे ऑक्सिजन वर अवलंबून असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यातील 11 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत आपल्याला 11 जणांचा मृत्यू झाल्याची  स्थानिक प्रशासनाने माहिती दिल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.