एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध समाजपयोगी उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र शिवसैनिकांना दिला आणि त्याच अनुषंगाने आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एरंडोल तालुका व शहर शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शहरातील मुख्य भागातून भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. रॅलीमध्ये शेकडो निष्ठावंत शिवसैनिकांनी सहभाग घेतला यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या शहर कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आगळीवेगळी आदरांजली वाहून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस सोसायटीच्या सदस्यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, महिला जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमित दादा पाटील, पारोळा तालुकाप्रमुख प्राध्यापक आर.बी.पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेनेचे तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, पारोळा युवासेना तालुकाप्रमुख रवींद्र पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख प्रमोद महाजन, माजी नगरसेवक सुभाष मराठे, माजी नगरसेवक सुनील चौधरी, माजी नगरसेवक रुपेश माळी, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, माजी नगरसेवक दशरथ चौधरी, माजी नगरसेवक अनिल कलाल, माजी नगरसेवक अतुल पाटील, देशमुख राठोड, राजू धनगर, सुनील मराठे, परेश बिर्ला, अरुण महाजन, गजानन महाजन, अमोल भावसार, चंदू जोहरी, अनिल महाजन, नितीन महाजन, आबा राणा, कल्पेश राजपूत, रवींद्र चौधरी, भरत चौधरी, प्रसाद महाजन, नितीन बोरसे, भूषण सोनार, महेश महाजन, हेमंत पाटील, कुणाल पाटील, निलेश अग्रवाल, गोपाल महाजन, जयेश महाजन, कल्पेश महाजन, अजय महाजन, मोहन महाजन, सचिन महाजन, राजेश महाजन, रमेश महाजन, किरण महाजन, पवन महाजन, यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.