Home राजकीय राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेय : नाना पटोले

राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेय : नाना पटोले

0
36

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोच प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवून या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर विरोधकांनी यावर जोरदार टीका केली आहे. यात टिव्ही नाईन या वाहिनीशी बोलतांना नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे. न

या संदर्भात नाना पटोले म्हणाले की, जे काही घडत आहे ते पाहता राज्यपाल पक्षपाती असल्याच्या आमच्या आरोपाला बळ मिळाले आहे. तर, राज्यपाल भवन हे भाजप भवन झाली असल्याची टिका देखील त्यांनी केली आहे.


Protected Content

Play sound