भाजपमध्ये काँग्रेसी नेत्यांचा प्रवेश सुरूच; आणखी एकाचा ॲडमिशन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडच्या काळात अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर भाजपने जोरदार धक्का दिला आहे. आत यात एक नवीन नाव जुळले आहे.  काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी ४ एप्रिल रोजी आज काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्यांनी सकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. त्यांनी आपण सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही आणि सकाळ-संध्याकाळ देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा अपमान करू शकत नाहीत.असे कारण देत राजीनामा दिला होता. त्यांना काँग्रेसने राजस्थान विधानसभा निवडणूकीत उदयपूर येथून उमेदवारी दिली होती. पण त्यांचा पराभव झाला आहे.

 

Protected Content