भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अभियानांतर्गत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित कार्यशाळेत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे नेते ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या कार्यशाळेत भडगाव नगर परिषदेचे शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक सचिन चोरडिया, युवक काँग्रेसचे पाचोरा विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, काँग्रेस आदिवासी सेलचे भडगाव तालुका अध्यक्ष नाना मालचे, काँग्रेस आदिवासी सेल जिल्हा उपाध्यक्ष मिथुन गायकवाड, वडजी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बाबाजी पाटील, संजय परदेशी, मंगलसिंग बच्छाव, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अतुल पाटील, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस आर. एस. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री आ. विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, ना. जयकुमार रावल, खा. स्मिताताई वाघ, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. डॉ. विजयकुमार गावित, आ. अमोल जावळे, आ. अनुप अग्रवाल, आ. राजेश पाडवी, आ. राम भदाणे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, एम. के. आण्णा पाटील, सदस्य नोंदणी अभियान प्रदेश सहसंयोजक डॉ. राधेश्याम चौधरी, किशोर काळकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाच्या ताकदीत मोठी वाढ झाली असून, जिल्ह्यात आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.