यावल प्रतिनिधी । यावल येथे श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मीक विकासव्दारे आयोजीत शेतकरी मार्गदर्शन मेळावा आज (दि.२६ जानेवारी) रोजी उत्साहात संपन्न झाला आहे.
येथील यावल ते फैजपुर मार्गावरील चोपडे सर यांच्या शेतात आज नियोजित शेतकरी मार्गदर्शक मेळावा असंख्य शेतकरी बांधवांच्या व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला .उद्घाटन यावलचे तहसीलदार महेश पवार आणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .एन .एस . पाटील, यावल तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव आणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. पी. कोते यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी ही या शेतकरी मेळाव्यास आपली उपस्थितीती दर्शविली. या कृषी शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास यावल तालुक्यातील विविध गावांमधुन अनेक शेतकरी बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी रमेश जाधव, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, प्रगतीशील शेतकरी पी.टी. चोपडे आदींनी शेतकऱ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केली. या जागतिक कृषी महोत्सवाचे औचित्य साधुन यावल येथे शेतकऱ्यांचे एकदिवसीय कृषी जागर कार्यक्रमाअंतर्गत जगभरातील सुमारे ११०० ठीकाणी शेतकरी बांधवांनी यात सहभाग नोंदविला असुन श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणीत व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक अंतर्गत व कृषी शेतकरी बांधवांना शेतीसह पुरक जोड व्यवसाय व प्रक्रीया उद्योगांची माहीती तसेच मार्गदर्शन आणी शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी बांधावर घेण्यात येणारे विशेष उपक्रम, देशी व गावराण बियाण्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलीत, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशवंत भोगे यांनी केले.