जामनेर येथे उद्या रोजगार महोत्सव

जामनेर प्रतिनिधी । तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस, सामाजिक न्याय विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (दि.२५ जुलै) रोजी सकाळी १० वाजता जळगाव रोडवरील बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये भव्य रोजगार महोत्सव आयोजित केला असून युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. 

पाचव्या इयत्तेपासून ते अंतिम वर्ष पदवी परीक्षा बसणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार असून यासाठी नाव नोंदणी सुरू असून युवकांनी मूळ कागदपत्र सोबत उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री एकनाथराव खडसे तर उद्घाटक म्हणून अरुणभाई गुजराथी उपस्थित राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र भैय्या पाटील, आ.अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिणीताई खडसे,मंगला अहिरे, महिला जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी,सतीश पाटील, संजय गरुड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.जास्तीत जास्त संख्येने युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे यांनी केले आहे.

 

Protected Content