यावल येथे मानसिक स्वास्थ, राजयोग ध्यानाभ्यास कार्यशाळा

WhatsApp Image 2019 03 07 at 3.20.18 PM

यावल (प्रतिनिधी)। राष्ट्रीय आयुष् अभियान महाराष्ट्र आणी ब्रह्मकुमारी वैद्यकीय प्रभागामार्फत मानसिक स्वास्थ आणी राजयोग ध्यानाभ्यास कार्यशाळा कार्यक्रम संपन्न झाला. यावल पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या राष्ट्रीय आयुष आमियानात प्रमुख पाहुणे म्हणुन यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बन्हाटे, डॉ. श्रीमती बोरोले, कार्यक्रमाचे मार्गदर्शक शशीकांत वारूळकर, व राजयोग विधी मायाताई बियाणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केली.

या कार्यशाळेच्या मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे आपण देत असलेल्या सेवेत अधिक निपुणता येते आणि अधिक चांगल्या प्रकार ची आरोग्य सेवा ही जनतेस दिली जावु शकते या उद्देशाने आरोग्य सेवेत असणाऱ्या आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शारीरिक स्वास्थया बरोबर मानसिक स्वास्थ्याचे प्रशिक्षण मिळावे आणी मानसिक स्वास्थयाचे त्यांनी प्रबोधन करावे या उद्देशाने कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील प्राथमीक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी, व कर्मचारी, ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, व ब्रह्यकुमारी वैद्यकीय प्रभागाचे पदाधिकारी व राष्ट्रीय आरोग्य आभीयानाचे सहायक संचालक डॉ. उमेश तागडे, मुंबई आणी डॉ. सचिन परब यांनी कार्यशाळे च्या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन केले.

Add Comment

Protected Content