Home प्रशासन तहसील यावलमध्ये गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? नागरिकांचा संतप्त सवाल

यावलमध्ये गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? नागरिकांचा संतप्त सवाल


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी हे नियुक्तीच्या मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क होत नसल्याने शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज रामभरोसे सुरू असल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 


Protected Content

Play sound