चोपडा, प्रतिनिधी | जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती तथा अपक्ष उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. प्रचाराला केवळ एक दिवस बाकी असतांना त्यांनी गोवोगावी जाऊन नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला आहे.
चोपडा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांच्यासोबत भाजपाचे आत्माराम म्हाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन शांताराम सपकाळे, हिम्मतसिंग पाटील, माजी आमदार कैलास पाटील यांच्या सोबत असणारी शिवसेना, त्यात इंदिरा पाटील, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील, सूतगिरणीचे संचालक, तसेच काँग्रेस (आय) चे चंद्रशेखर युवराज पाटील, भाजपाचे प्रदीप पाटील, लक्ष्मण पाटील, प्रकाश रजाळे, देवाबापू पाटील, प्रकाश पाटील, असे अनेक पक्षाचे नेते मंडळी आजी माजी जिल्हा परिषदचे सद्स्य व अनेक गावाचे आजी ,माजी सरपंच , संस्थाचे पदाधिकारी सोबत असल्याने एक मोठी फळी सोबत घेऊन प्रचार करत आहेत. यात प्रभाकर सोनवणे प्रचारात फिरत आहेत. चोपडा विधानसभा मतदार संघात एकूण १५१ गाव आहेत. यात चोपडा तालुक्यातील ११६ तर यावल तालुक्यातील ३५ गावे आहेत. त्यात प्रभाकर सोनावणेची प्रचार फेरी पूर्णत्वाकडे आली आहे. प्रभाकर सोनवणे हे मतदारांशी हितगुज करण्यावर भर देत आहेत. प्रचारफेरीच्या वेळेस आबालवृद्ध, महिला, वयस्कर मतदाराचे समस्या जाणून घेत आहेत. तसेच खेड्या गावातील वयोवृद्ध व्यक्तींकडून त्यांची समस्या जाणून घेत आहेत. त्यामुळे प्रभाकर सोनवणे हे मतदारांना आपलेसे झाले आहेत. प्रचारात कार्यकर्ते स्ववस्फूर्तीने काम करत आहेत. त्यांनी प्रचारात मुसंडी मारली असून ठिकठीकांणी ढोल ताश्यासह आतिषबाजी करून ,औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. आज त्यांनी खड्गाव, गोरगावले, छोटे गोरगावले, खेडीभोकरी, मंगरुळ, सुटकार, वटार, वडगाव, रुखनखेडा, चांदसणी, कमळगाव, मितावली, पिप्री, देवगाव, पारगाव, वर्डी, माचले आदी अनेक गावांमध्ये भेट देऊन प्रचारफेरी पूर्ण केली. यागावांमध्ये प्रभाकर सोनवणेंचा आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. गोरगावल्यातील प्रत्येक गल्लीत आतिषबाजी करण्यात आली. यावेळी मनोहर पाटील, अनिल पाटील, प्रवीण पाटील, गोपाल बाविस्कर, विजय बाविस्कर, नामदेव सिरसाट, रोहिदास कोळी, गुरुदास पाटील, भास्कर पाटील, गोविदा बाविस्कर, योगीराज सपकाळे, वामन सपकाळे, पंकज महाले, जगन सिताराम पाटील, दगडू भिल, सीताबाई भिल, रवींद्र पाटील, डिंगबर पाटील, अशोक पाटील, वासुदेव पाटील, मणीलाल पाटील, चंद्रकांत बिऱ्हाडे, संतोष बागुले,शरद बागूले, प्रल्हाद पाटील, सुनील बागूले आदी शेकडो कार्यकर्ते हजर होते.