गडकिल्ल्यांवर दारूचे अड्डे आणि छमछम सुरु होणार – पवारांनी साधला निशाणा

sharad pawar

पंढरपूर प्रतिनिधी । छत्रपतींच्या जाज्वल पराक्रमाचा इतिहास असलेल्या गडकिल्ल्यांवर आता हे दारूचे अड्डे आणि छमछम सुरु करायला लागले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत म्हणाले, तुम्ही दुसऱ्याला उभे करून कुस्तीची भाषा करताय मात्र आमचे पैलवान तुम्हाला कसे चितपट करतात, हे येत्या २४ तारखेला दिसेल, अशी फटकेबाजी पवारांनी पंढरपूरमध्ये केली. आज येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ जाहिर सभेत बोलत होते.

देशातले मोदी सरकार सरकारी यंत्रणा गुन्हेगारांच्या विरोधात वापरण्याऐवजी राजकीय विरोधकांवर वापरत आहेत. माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम सध्या तुरुंगात आहेत, तर कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनाही तुरुंगाची हवा खायला लागत आहे, असे सांगत मला मात्र ‘ईडी’ची भीती दाखवू नका. मी मेल्या आईचे दूध प्यायलो नसून मी तुमच्या ‘ईडी’लाच ‘येडी’ करून टाकीन, अशी तुफानी टोलेबाजी आज शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये केली. यावेळी व्यासपाठीवार राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आवर्जून उपस्थित होते.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याबाबत वक्तव्य केले असतानाच राज्य सरकारने चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांवरील धडा वगळल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब गंभीर असून शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे संस्कार लहान मुलांना अभ्यासात ठेवणे आवश्यक असताना ते काढण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा घणाघात पवार यांनी केला.

Protected Content