Home Cities जळगाव आध्यात्मिक समन्वय समितीमध्ये डॉ. गुरुमुख जगवानी; शनिवारी करणार घंटानाद आंदोलन

आध्यात्मिक समन्वय समितीमध्ये डॉ. गुरुमुख जगवानी; शनिवारी करणार घंटानाद आंदोलन

0
109

जळगाव प्रतिनिधी । आध्यात्मिक समन्वय समितीमध्ये माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवानी यांची निवड करण्यात आली असून या माध्यमातून शनिवारी देवालये उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

अनेकवेळा मागणी करून देखील महाराष्ट्र सरकार देवस्थाने उघडण्यास परवानगी देत नसल्याने यासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी आध्यात्मिक समन्वय आघाडी तयार करण्यात आली आहे. सिंधी ग्लोबल ट्रस्टचे राष्ट्रीय प्रमुख माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी यांचा देखील त्या समितीमध्ये समावेश आहे.

या समितीमध्ये महाराष्ट्रातील विविध धार्मिक आध्यात्मिक संघटना, संस्था, प्रमुख देवस्थानांचे अध्यक्ष, विश्‍वस्त आणि विविध पंथ संप्रदायाच्या प्रमुखांचा समावेश आहे. समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली असता शनिवार दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.गुरुमुख जगवानी यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound