खाजकुयरी अंगावर टाकून पाच लाखांची बॅग लांबविली

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अंगावर खाजकुयरी टाकून पाच लाख रूपयांची बॅग लांबविल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे.

चोरटे नवनवीन शक्कल लढवून चोरी करत असतात. असाच एक प्रकार येथे दिनांक ३१ रोजी दुपारी घडला. चोपडा शहरातील हॉटेल योगी जवळील इंडियन गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये केशरलाल मोतीलाल पाटील (वय ४५, रा.गरताड) हे मॅनेजर आहेत. मंगळवारी दुपारी पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी रमेश सोनवणे हे दोघे दुपारी शहरातील जुना शिरपूर रोडवरील स्टेट बँकेत – पैसे काढण्यासाठी दुचाकीवर गेले होते. बँकेतून पैसे काढून घेतल्यानंतर साडेचार वाजेच्या सुमारास रमेश सोनवणे हे दुचाकी लावून एकटे पुढे गेले. तर केशरलाल पाटील हे पैशांची बॅग घेऊन दुचाकीवरच बसले होते.

त्याचवेळी त्यांच्या मानेजवळ अचानक खाज सुटली. पाटील हे मान चोळत असताना एकाने त्यांच्या पाठीवर मुंग्या चालत असल्याचे सांगत ते धुण्यासाठी पाण्याचा जग आणून दिली. पाटील हे खाली वाकून मान धुत असतांनाच त्या व्यक्तीने दुचाकीवरील पैशांची बॅग उचलून पळ काढला. थोड्या अंतरावर उभ्या असणार्‍या दुचाकीवरील साथीदाराच्या मदतीने त्यांनी पलायन केले.
या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून चोरटा हा परिसरातील एका दुकानाच्या सीसीटिव्हीत कैद झाला आहेे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content