जळगाव जिल्ह्यात महिला संघटना मजबूत करण्यावर भर – अरुंधती शिरसाठ

भुसावळ प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीचे संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ यांनी शासकिया विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

शहरत वंचित बहुजन महिला आघाडीचा दि. १३ रोजी मेळावा तसेच महिला आघाडी बांधणीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी मेळाव्याच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट करतांना सांगितले की, दर तीन वर्षांनी महिला आघाडीची पुर्नबांधणी करण्यात येऊन चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येते. त्यानुसार हा मेळावा घेण्यात येत आहे. आजची महिला संकटांवर मात करणारी असून त्यांना पुढे आणण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील महिलांना एकत्र घेता संघटना वाढविण्यात येईल. यासह महिला अत्याच्यासाच्या वाढत्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त करता संघटना महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द्व कायम लढा देता असून यापुढेही हा लढा कायम सुरु राहणार आहे. तसेच पुणे येथील तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील केले. यासह भुसावळ निवडणुक संघटनेतर्फे पूर्ण ताकदीनिशी लढण्यात येणार असल्याचे सांगितले. 

यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. निशा शेंडे, प्रदेश सदस्या शमीभा पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,डाॅ.मनोज निकाळजे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे,जिल्हा संघटक अरुण तायडे, बाळा पवार, नितिन रणित जिल्हा उपाध्यक्ष, विद्यासागर खरात, सचिन बाऱ्हे जिल्हा I T प्रमुख, सचिन सुरवाडे जामनेर, संगीता भामरे, वंदना सोनवणे,तालुकाध्यक्ष, संतोष कोळी भुसावळ तालुकाध्यक्ष, बाळु शिरतुरे रावेर तालुकाध्यक्ष, महेंद्र सुरडकर जिल्हा उपाध्यक्ष, रफिक बेग जिल्हा उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.

Protected Content