जळगाव पीपल्स बँकेतर्फे महिलांना इलेक्ट्रॉनिक रिपेअरींगचे प्रशिक्षण ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येथील जळगाव पीपल्स बँकेतर्फे महिलांना एक दिवसीय इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरींगचे प्रशिक्षण देण्यात आले.

पिपल्स बँकच्यावतीने बँकेशी संलग्न असलेल्या बचत गटाच्या महिलांना इलेक्ट्रॉनिक रिपेअर कश्या पध्दतीने करावे यासाठी महिलांना एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी विविध १५ बचत गटातील महिला उपस्थित होत्या. या महिलांना शुभलक्ष्मी इलेक्ट्रॉनिक सर्विसचे संचालक सतीश डोळसे यांनी मिक्सर, एसी, टीव्ही, आणि फ्रिज दुरूस्त करण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच यावेळी बँकेच्या महिला बचत गट विभागाच्या प्रमुख शुभश्री दप्तरी यांनी महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा. म्हणून महिलांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे हा त्यामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांस ६० ते ७० महिलांनी उपस्थिती लावली. काही महिलांनी सांगितले की, आम्हाला मोलाचे व उपयोगी प्रशिक्षण मिळाल्याचे नमूद केले आहे.

पहा : जळगाव पीपल्स बँकेच्या प्रशिक्षण शिबिराबाबतचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content