सावदा दूध उत्पादक संस्थेची निवडणूक बिनविरोध !


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील सावदा दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या सन २०२५ ते २०३० या कार्यकाळासाठीच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध पार पडली आहे. एकूण १७ जागांसाठी उमेदवार उभे होते, मात्र महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम, २०१४ च्या नियम ३२ नुसार, सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे कोणत्याही जागेसाठी प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने मतदान प्रक्रिया झाली नाही. या निवडणुकीमुळे संस्थेच्या कामकाजात शांतता व एकोपा दिसून आला.

अविरोध निवडून आलेले उमेदवार याप्रकरणे :
सर्वसाधारण मतदारसंघ: वाणी राहुल नोमदास, नेमाडे भरत प्रल्हाद, वाणी परिक्षित शरद, चौधरी धनंजय वासुदेव, चौधरी संजय रामचंद्र, राणे मुरलीधर सुदाम, नेमाडे रविंद्र बळीराम, पाटील किरण जनार्दन, बढे जगदीश लहू, वाघुळदे विजय प्रकाश, बेंडाळे रविंद्र श्रावण, जावळे कुशल सुरेंद्र, इतर मागास वर्गीय मतदारसंघातून बढे देवानंद नामदेव, वि.ज.भ.ज. व विशेष मागास प्रवर्गातून जोगी हेमराज मन्साराम, महिला राखीव मतदारसंघातून बाँडे ज्योत्स्ना नरेंद्र, चौधरी सुलभा यशवंत तर विशेष म्हणजे, अनुसूचित जाती मतदारसंघातील १७ वी जागा रिक्त राहिली आहे.

संस्थेच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या एकमतामुळे ही निवडणूक शांततेत आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण झाली. नव्याने निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यात येत असून, संस्थेच्या उत्कर्षासाठी नवीन संचालक मंडळ भरीव कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एस.पाटील यांनी पाहिले.