यावल तहसीलदार कार्यालयात मतदार दिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात निवडणुक काळात तसेच मतदान नोंदणी, मतदार जनजागृती कामात प्रशासनास मदत करणारे व उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मानित केले व निष्पक्ष मतदाराची प्रतिज्ञा घेण्यात आली.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यावल तहसील कार्यालय यावल येथे शुक्रवारी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, निवासी नायब तहसिलदार संतोष विनंते, निवडणुक नायब तहसिलदार शैलेश तरसोदे, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, नायब तहसिलदार मनोज खारे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थित मतदारांसह जिल्हाधिकारी यांनी निष्पक्ष मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

राष्ट्रीय मतदान दिनाच्या औचित्य साधून ११ रावेर विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये सेलिब्रिटी म्हणून जनजागृती चे उत्कृष्ट कार्य करणारे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे शिक्षक प्रा.डॉ. नरेंद्र महाले यांना मतदान जनजागृती चे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध २० बीएलओ चा देखील सत्कार करण्यात आला.

आपल्या मनोगतामध्ये रावेर विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये यावल कार्यक्षेत्रातील उत्तम कार्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी उत्तम कौतुक केले व याच पद्धतीने मतदारांना मतदारांमध्ये जनजागृती करत आपले कार्य सतत चालू ठेवण्याचे आवाहन देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नरेंद्र महाले तर आभार शैलेश तरसोदे यांनी मानले. तर कार्यक्रमा च्या यशस्वीते करीता नितीन तायडे, संदीप शिरसाठ, पराग सरोदे सह आदींची उपस्थिती होती.

Protected Content